19.5 C
New York

AC Temperature : जपानमध्ये 26 अंश, इटलीमध्ये 23… भारतातच मग एसीचे किमान तापमान 20 अंश का केलं जातंय?

Published:

देशातील कोणत्याही शहरात जा, तिथे आपल्याला उकाडा, गर्मी जाणवतेच. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आुण घरे, कार्यालये, मॉल, रुग्णालये अशा सगळ्या ठिकाणी एसीचा वापर करतो. अनेक घरांमध्ये एसी 16 अंश किंवा 16 अंश सेल्सिअस तापमानात चालवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का आता या एसीचा रिमोट कंट्रोल सरकार (India Government) आपल्या हातात घेण्याचा विचार करतंय? हो…एसी किती अंशावर चालणार हे आता सरकार ठरवणार ( Standardize AC Temperature) आहे. जपानमध्ये 26 अंश, इटलीमध्ये 23…मग भारतातच एसीचं किमान तापमान 20 अंश का केले जातंय? असा तुम्हाला प्रश्न पडतोय का? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.

सरकार एसीचे तापमान प्रमाणित करण्याची तयारी करत आहे. एसीचं किमान तापमान 20 करण्याचा विचार करत आहे. या नियमानुसार, एसीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि 28 अंशांपेक्षा जास्त नसावे. परंतु लक्षात घ्या की, असं करणारा भारत हा एकमेव देश नाही. जगभरात एसीच्या तापमानाबाबत वेगवेगळे मानके आणि पसंती आहेत. जगभरातील देशांमधील एसीच्या तापमानाच्या मानकांबद्दल आपण जाणून घेऊ या.

AC Temperature यामागे उद्देश काय?

सरकार एसीचा रिमोट कंट्रोल हातात घेतंय, पण यामागे नेमका उद्देश काय आहे? असा देखील सवाल उपस्थित होतोय. केंद्रीय कॅबिनेट मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोदी सरकारच्या 2047 सालाच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. ऊर्जा वाचवणे, वीज वापर कमी करणे आणि पर्यावरण संतुलन राखणे, असा यामागे हेतू आहे. सरकारच्या नियमानुसार, एसीचे तापमान 20 अंश ते 28 अंशांच्या दरम्यान असेल. म्हणजेच, ते थंड होण्यासाठी 20 अंशांपेक्षा कमी आणि गरम करण्यासाठी 28 अंशांपेक्षा जास्त सेट करता येणार नाही. हे आपण पहिल्यांदाच करतोय. परंतु असे अनेक देश आहेत, ज्यांनी हे मानकं निश्चित केलंय. जपानने 26 अंश मानकीकरण केले आहे. इटलीने 23 अंश केलंय.

विजेची प्रचंड मागणी, वाढते वीज बिल आणि कार्बन उत्सर्जन एकाच वेळी कमी होणार आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते एसी तापमानात 1 अंश वाढ केल्याने सहा टक्के वीजेची बचत होते. कूलिंग मोड, हीटिंग मोड, आइडियल टेंपरेचर और एनर्जी एफिशिएंट रेंजमध्ये एसीची मर्यादा निश्चित केली जाते.

AC Temperature एसींची ऑपरेटिंग मर्यादा काय?

एसींना कमालीची ऑपरेटिंग मर्यादा असते, किमान थंड तापमान 16°C (60°F) आणि कमाल थंड तापमान 30°C (86°F) असते. त्यानंतर वापरकर्ते त्यांचे वातावरण आणि इतर परिस्थितीनुसार एसी तापमान निवडू शकतात. भारतीय मानक ब्युरोने शिफारस केली की, भारतात एसी 24-26 ​​अंश सेल्सिअस तापमानात चालवावा. जेणेकरून आपल्याला थंडावा आणि वीज बचत दोन्ही मिळते.

अमेरिकेपासून चीनपर्यंत, प्रत्येक देशांत आपल्या स्वतंत्र वीज बचत संस्था आहेत. अमेरिकेत वीज बचतीसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचे काम ENERGY STAR चे आहे, तर भारतात हे काम ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) द्वारे केले जाते. युरोपमध्ये युरोपियन एनर्जी लेबलिंग (EU) एजन्सी अस्तित्वात आहे. याशिवाय, जपानमध्ये टॉप रनर प्रोग्राम अस्तित्वात आहे. चीनमध्ये चायना एनर्जी लेबल एजन्सी हे काम पाहते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img