ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) या चर्चांना पूर्णविराम दिलाय. निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे (Nitesh Rane) यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. परंतु काहीवेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट (Maharashtra Politics) देखील केली आहे. पोस्ट का हटवली, यासंदर्भात आता निलेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nilesh Rane निलेश राणे यांचं उत्तर
निलेश राणे यांनी म्हटलंय की, नितेश माझा भाऊ आहे. त्याने मला जे अधिकार दिलेत. त्या अधिकाराने बोललो आहे. मी हक्काने बोललो आहे. त्याने मला वडिलांप्रमाणेच मान दिलाय, त्याच अधिकाराने मी बोललो आहे. मला जो मेसेज द्यायचा होता, तो दिला. याअगोदर सुद्धा मी डिलिट केलेली आहेत, याचा वेगळा अर्थ काढू नका. हा एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला सल्ला होता, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
Nilesh Rane नितेश राणे यांनी काय म्हटलं होतं?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केली होती. त्यानंतर समितीच्या कामांवर स्थगिती आणली. या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं होतं, कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे. नितेश राणे यांच्या याच वक्तव्याला उद्देशून निलेश राणे यांनी ही पोस्ट केली होती. तर नितेश राणे यांनी या पोस्टला उत्तर सुद्धा दिलं होतं.
आमदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी म्हटलं की, राज ठाकरेंचा प्रवास पाहता, राजसाहेब उबाठा सोबत जातील असं मला वाटतं नाही. त्यांच्यासोबत जे आजपर्यंत झालं आहे, ते पाहता राजसाहेब जाणार नाहीत. जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा, अशी आमची इच्छा आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात आमची ताकद दिसेल, निलेश राणे यांनी म्हटलं आहे.