30.1 C
New York

Food Allergy : अन्नपदार्थाची ॲलर्जी कशी ओळखायची? लक्षणे कोणती?

Published:

प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. काही लोकांना प्रत्येक अन्नपदार्थ आवडतो, तर काहींना विशिष्ट पदार्थांची अ‍ॅलर्जी असते. याला फूड अ‍ॅलर्जी म्हणतात, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नसते की कोणत्या अन्नपदार्थामुळे (Health Tips) त्यांना अ‍ॅलर्जी होत आहे. अ‍ॅलर्जीची लक्षणे सहसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून ते दोन तासांत दिसून येतात, परंतु लोक त्याला आजार (Food Allergy) मानतात. त्यानुसार चाचणी घेतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, चाचणी अहवाल देखील सामान्य येतो आणि समस्या काय आहे, हे कळत नाही.

दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलच्या माजी वरिष्ठ रहिवासी आणि ऍलर्जिस्ट डॉ. नीता नायक यांनी टीव्ही नाईनला दिलेल्या माहितीनुसार, ॲलर्जी कोणत्याही वयात होऊ शकते. ती जन्माच्या वेळी देखील होऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोकांना वर्षानुवर्षे माहित नसते की, त्यांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी आहे. याला सायलेंट ऍलर्जी म्हणतात. अॅलर्जीची लक्षणे खूप उशिरा दिसून येतात, परंतु जर काही खाल्ल्यानंतर तुम्हाला पोटात गॅस, अपचन, चेहऱ्यावर मुरुम यासारखी लक्षणे दिसली, तर ही त्या अन्नाच्या ऍलर्जीची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Food Allergy अ‍ॅलर्जीची लक्षणे कोणती?

मेयोक्लिनिकच्या मते, जर काही खाल्ल्यानंतर काही तासांत त्वचेवर खाज सुटणे किंवा अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी येणे, चेहरा, ओठ, जीभ किंवा घसा सूज येणे, पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब, चक्कर येणे किंवा बेहोशी होणे अशी लक्षणे दिसली तर ती अन्नाची ऍलर्जी असू शकते. ते ओळखण्यासाठी तुम्ही काही चाचण्या करू शकता. यासाठी (स्किन प्रिक टेस्ट) केली जाते. यामध्ये, संशयित अन्नपदार्थाची थोडीशी मात्रा शरीराच्या कोणत्याही भागावर लावली जाते आणि त्वचेला हलकेच टोचले जाते. जर तिथे सूज किंवा लालसरपणा असेल तर ते ऍलर्जीचे लक्षण असू शकते. याशिवाय, रक्त तपासणी केली जाते. यामध्ये, इम्युनोग्लोबुलिन ई (आयजीई) अँटीबॉडीचे प्रमाण मोजले जाते, जे ऍलर्जीची प्रतिक्रिया दर्शवते.

Food Allergy कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

अमेरिकन कॉलेज ऑफ ऍलर्जी, अस्थमा आणि इम्युनोलॉजी (ACAAI) नुसार , अन्न ॲलर्जीवर उपचार करण्यासाठी, तुम्ही ऍलर्जिस्ट आणि आहारतज्ञ दोघांचाही सल्ला घ्यावा. हे डॉक्टर ऍलर्जी ओळखतील आणि समस्येनुसार तुमच्यासाठी आहार चार्ट देखील तयार करतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img