36 C
New York

RCB : तब्बल १८ वर्षाच स्वप्न झालं साकार; आरसीबीने ‘IPL ट्रॉफी’वर नाव कोरलं

Published:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आरसीबीने अंतिम सामन्यात विजय मिळवला. दरम्यान, गेली १८ वर्षांपासून खेळणारा विराट आज टीम विजयापर्यंत आल्यानंतर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटी, ट्रॉफी जिंकण्याचं विराटच स्वप्न पूर्ण झालं.

आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर विराट भावूक झाला. विराटला भावना अनावर झाल्या. तर दुसऱ्या बाजूला 2014 नंतरची पंजाबची आयपीएल फायनलमध्ये पराभूत होण्याची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली.

RCB विराट कोहली भावूक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 चा विजेतेपदाचा सामना जिंकला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने पहिले विजेतेपद जिंकले.संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आरसीबीच्या विजयानंतर भावूक झाला.

पंजाबची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. 43 धावांची भागीदारी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने केली. 24 रन्स करुन त्यानंतर प्रियांश आर्या आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंह याने 26 करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आरसीबीने पंजाबला ठराविक अंतराने झटके देत शेवटपर्यंत सामन्यावरील पकड कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.

पंजाबसाठी शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शशांकने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. शशांकाने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 61 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मात्र त्यांचं हे योगदान आरसीबीला चॅम्पियन होण्यापासून रोखू शकलं नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img