देशात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून (Corona Active Cases) वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, दिल्ली (Delhi) सारख्या राज्यात आता पुन्हा एकदा कोरोना पाय पसारतोय. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 360 नवीन रुग्ण सापडले आहे. त्यामुळे आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3758 पेक्षा जास्त झाली आहे. माहितीनुसार, 1400 रुग्ण आतापर्यंत केरळ राज्यात सर्वाधिक आढळले आहे तर 841 महाराष्ट्रात आणि 436 रुग्ण दिल्लीतआढळले आहे.
तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये (Kerala) एकाचा तर कर्नाटकामध्ये (Karnataka) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये 63 वर्षीय पुरुषाचा तर केरळमध्ये 24 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Corona Active Cases देशात आतापर्यंत कोरोनामुळे 28 मृत्यू
कोरोनामुळे केरळ आणि महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक मृत्यू झाले असून 7-7 जणांचा मृत्यू दोन्ही राज्यात झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत तर दुसरीकडे 383 जण कोरोनातून बरे झाले आहे. आतापर्यंत 1818 कोरोना रुग्ण देशात कोरोनामुळे बरे होऊन घरी परतले आहेत.
Corona Active Cases JN.1 व्हेरियंट वाढत आहे…
माहितीनुसार, देशात ओमिक्रॉनचा नवीन सब- व्हेरियंट JN.1 पाय आता पसरत आहे. हा व्हेरियंट सुरुवातीला केरळ राज्यात आढळला होता. तर आता हा व्हेरियंट हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे. सध्या या व्हेरियंटची प्रकरणे वाढत आहे. माहितीनुसार, कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरतो, देशात त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Corona Active Cases 1 जूनपर्यंत कोणत्या राज्यात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण
केरळ : 1400
महाराष्ट्र : 814
दिल्ली : 436
गुजरात : 320
बंगाल : 287
कर्नाटक : 238
तामिळनाडू : 199
उत्तर प्रदेश : 147