16.7 C
New York

Vaishnavi Hagawane : हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा, पिस्तूल परवान्यासाठी पोलिसांची फसवणूक

Published:

वैष्णवी हगवणे या (Vaishnavi Hagawane) विवाहितेने सासरच्यांकडून सतत होणारा छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद अटकेत आहेत. आता हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवला म्हणून शशांकविरुद्ध वारजे आणि सुशील हगवणेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तुलाचा परवाना मिळवताना आपण पुण्यातील रहिवासी असल्याचे पत्ते त्यांनी दिले होते. पुणे पोलीस आयु्क्तालयातून पिस्तूल परवाना कसा घेतला? विशेष म्हणजे एकाच दिवशी परवाने आले होते. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवले म्हणून हगवणे बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2022 मध्ये हगवणे कुटुंबियांकडून शस्त्र परवान्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडे अर्ज आला होता. परंतु, पोलिसांनी दोघांचेही अर्ज फेटाळले होते. यानंतर दोघांनीही पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते तयार केले. यासाठी भाडोत्री घरात राहत आहोत असे भासवण्यासाठी भाडे करार तयार केले होते. शशांकने वारजे तर सुशीलने कोथरुड भागात राहत असल्याचे दाखवले होते. याआधारे त्यांनी पोलिसांकडून पिस्तूल परवाना मिळवला होता अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी वैष्णवीच्या नातेवाइकांनी केली आहे. आता सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती झाल्याने या खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीस अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. कावेडिया यांचा अनुभव लक्षात घेता, या प्रकरणात न्याय मिळण्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img