19.4 C
New York

Ladki Bahin Yojana : अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी; पैशांची वसुली होणार?

Published:

अनेक गैरप्रकार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) उघडकीस येऊ लागले आहेत. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीही लाडकी बहीण योजनेत लाभ घेतल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 लाख 60 हजार 559 कर्मचाऱ्यांची तपासणी यानुसार करण्यात आली. यात योजनेचा लाभ 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे उघडकीस आले आहे.

1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा डेटा सामान्य प्रशासन विभागाने या तक्रारींची चौकशी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला दिला होता. महिला कर्मचाऱ्यांनी यापैकी किती योजनेचा लाभ घेतला याची माहिती घेण्यात आली. यानंतर असे लक्षात आले की लाडकी बहीण योजनेचा निधी जवळपास 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिल महिन्यांपर्यंत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले आहेत. 3 कोटी 58 लाख रुपये इतका निधी या सर्व महिलांना देण्यात आलेला आहे.

सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले. लाभही घेतला. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देशच कुचकामी ठरू लागला आहे. आता पहिल्या टप्प्यात दीड लाख कर्मचाऱ्यांची तपासणी झाली आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आता ज्या 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून प्रत्येक विभागाला याबाबतचा आदेश लवकरच देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

दरम्यान, ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, संजय गाधी निराधार योजनेतून घेत असतील तर त्यांना त्या योजनेचे 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे तसंही त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना 1000 रुपये मिळत आहे आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. हेच मूळ शासन निर्णयातही म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img