17 C
New York

Indiao Pakistan Tension : राजस्थानात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या

Published:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा माजी पीएला अटक केली आहे. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय साठी काम करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) राज्य रोजगार विभागाचा कर्मचारी शकूर खान मंगालियारला जैसलमेरमध्ये सीआयडी आणि गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त पथकाने अटक केली. आता त्याच्या संशियत हालचालींची माहिती घेतली जात आहे. मंगालियारच्या मोबाइलमध्ये काही पाकिस्तानी फोन नंबर आढळून आले आहेत. इतकेच नाही तर या शकूर खान मंगालियारने पाकिस्तानचे दौरेही केले होते, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

Indiao Pakistan Tension काँग्रेस नेत्याशी राजकीय संबंध

सुरक्षा यंत्रणांनी या कर्मचाऱ्याच्या काँग्रेसशी राजकीय संबंधाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगालियार मागील काँग्रेस सरकारच्या काळात एक काँग्रेस पदाधिकाऱ्याचा खासगी पीए म्हणून काम करत होता. मंगालियार हा पाकिस्तान सीमेजवळ असणाऱ्या बरोदा गावाचा आहे. त्याच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. तपास यंत्रणांना त्याच्या मोबाइलमधून अनेक पाकिस्तानी फोन नंबर मिळाले आहेत. याबाबत त्याला माहिती देता आली नाही.

Indiao Pakistan Tension सात वेळा केला पाकिस्तानचा दौरा

मागील काही वर्षात मंगालियारने सात वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. ही गोष्ट त्याने मान्य केली आहे. त्यामुळे काळजीत वाढ झाली आहे. एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले की उच्च मुख्यालायकडून संशयित घडामोडींसंदर्भात अलर्ट मिळाला होता. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. आता आम्ही सर्व तथ्यांचे सत्यापन करत आहोत. मंगालियारच्या फोनमध्ये सैन्यासंदर्भात फोटो किंवा व्हिडिओ आढळलेले नाहीत. परंतु, अनेक फाइल्स हटवण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Indiao Pakistan Tension पाकिस्तानी हँडलर्सना संशयित डेटा दिला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही राज्यांतून कमीत कमी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्राही आहे. या लोकांवर पाकिस्तानी हँडलर्सना संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. 11 मे रोजी पंजाब पोलिसांनी मालेरकोटला येथून दोघा जणांना ताब्यात घेतले होते. हरियाणा पोलिसांनी 13 मे आणि 15 मे रोजी दोघा जणांना अटक केली. 7 मे आणि 14 रोजी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img