21.8 C
New York

Sanjay Raut : मालमत्ता खरेदीसाठी शिरसाटांकडे पैसा आला कुठून? राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

Published:

कौटुंबिक वादळ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मुलाच्या जीवनातील काल शांत झालं. शारीरिक आणि मानसिक छळाचा सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने कालच सर्व आरोप मागे घेतले. राजकीय वर्तुळातील टीका टिप्पणी यानंतर थांबली असली तरी आज दुसऱ्या एका प्रकरणाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गौप्यस्फोट केला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचं साधन काय? त्यांच्याकडे महागडी मालमत्ता खरेदीसाठी इतका पैसा आला कुठून? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिरसाट पित्रापुत्रांवर घणाघाती टीका केली. राऊत पुढे म्हणाले, हे कौटुंबिक विषय असतात. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या नेत्याने पडू नये. त्यासाठी महिला आयोग आहे. महिला आघाडी आहे. त्यांनी त्याच्याविषयी बोललं पाहिजे. मी स्वतः कधी कोणाच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर बोलत नाही आणि बोलू नये.

राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू…ठाकरे गटाच्या नेत्याने धमकावले

पण तुम्ही ज्या मंत्र्यांचे नाव घेतले संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव त्यापेक्षा भयंकर प्रकरण आहे. या महाशयांनी संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी प्रकरण आहे. अत्यल्प मूल्यावर प्रॉपर्टी ताब्यात घेतली. ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया राबवली गेली. एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत. जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. 67 कोटी रुपयांनी हॉटेलची मालमत्ता विकत घेतली गेली. मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत मालमत्ता मिळावी यासाठी लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने राबवण्यात आली. निविदा भरणाऱ्या लोकांना कमी रक्कम भरायला लावली असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img