28.5 C
New York

Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने झोडपले; १३५ मिमी पावसाची नोंद, १०७ वर्षांचा विक्रम मोडला

Published:

सोमवारी (दि.26) सकाळपासून राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबईला (Mumbai Rain) मुसळधार पावसाला अक्षरक्षः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मुंबईला पुढील काहीतास रेड अलर्ट दिला असून, मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १०७ वर्षांपूर्वीचा मे महिन्यातील पावासाचा विक्रमही आज पडलेल्या पावसाने मोडीत काढला आहे.

Mumbai Rain १०७ वर्षांचा विक्रम मोडीत

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, कुलाबा येथील किनारी वेधशाळेत सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३५ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत ३३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात सर्वाधिक २९५ मिमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे मे १९१८ मध्ये नोंदवलेला २७९.४ मिमीचा मागील विक्रम मोडला आहे. सांताक्रूझ स्थानकावर या महिन्यात आतापर्यंत १९७.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस २००० मध्ये ३८७.८ मिमी इतका पडला होता.

Mumbai Rain हाय टाईडचा इशारा

BMC कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देण्यात आली आहे. ज्यात मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सकाळी ११:२४ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून, ४.७५ मीटरच्या लाटा उसणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर सायंकाळी ०५:१८ वाजता ओहोटी येणार असून, यादरम्यान समुद्रात १.६३ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय रात्री ११:०९ मिनिटांनी पुन्हा समुद्राला भरती येणार असून याकाळात समुद्रात ४.१७ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain विविध भागांमध्ये खालीलप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे:

मध्य विभाग (CT): ब्रिटानिया SWD आणि सेवरी कोळीवाडा – 12 मिमी, गोखले रोड मनपा शाळा – 11 मिमी

पूर्व उपनगर (ES): कलेक्टर कॉलनी चेंबूर – 13 मिमी, चेंबूर अग्निशमन केंद्र आणि MW वॉर्ड कार्यालय – 9 मिमी

पश्चिम उपनगर (WS): सुपारी टँक आणि नारियलवाडी सांताक्रूझ – 25 मिमी, खार दांडा पाली हिल – 24 मिमी, HE वॉर्ड कार्यालय – 18 मिमी, HW वॉर्ड कार्यालय – 16 मिमी, विलेपार्ले अग्निशमन केंद्र – 15 मिमी, अंधेरी अग्निशमन केंद्र आणि चाकला मनपा शाळा – 14 मिमी, मालवणी अग्निशमन केंद्र – 12 मिमी, वर्सोवा पंपिंग स्टेशन – 11 मिमी

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img