डीमेंशिया एक गंभीर आणि कॉमन (Dementia) आजार झाला आहे. या आजारात माणसाचा मेंदू प्रभावित होतो. ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. जगात आजमितीस जगात 55 मिलियन पेक्षा जास्त लोक डिमेन्शियाने ग्रस्त आहेत. तसेच दरवर्षी एक कोटी नवे रुग्ण आढळून येत आहेत. डीमेंशिया अनेक प्रकारचा असू शकतो. अल्झायमर (Alzheimer) यामध्ये सर्वात कॉमन आणि गंभीर आजार आहे. हा आजार हळूहळू मेंदूतील कोशिका नष्ट करून टाकतो. यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते.
Dementia काय आहे अल्झायमर?
अल्झायमर एक प्रोग्रेसिव आजार आहे. म्हणजेच हा आजार हळूहळू वाढत जाणारा आहे. यामध्ये मेंदूतील पेशी आणि त्यांच्या आपसातील वीण नाहीशी होते. यामुळे विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती, सामान्य जीवन जगण्याची योग्यता यांवर परिणाम होतो. विसरण्याची सवय, भ्रमाची स्थिती, सामान्य कामे करताना अडचणी हे या आजाराचे मुख्य लक्षणे आहेत.
Dementia उपचार नाही पण अटकाव शक्य
या आजारावर पूर्ण उपचार अजून सापडलेला नाही. पण याची सुरुवातीची लक्षणे वेळेवर लक्षात आली तर या आजाराला वाढण्यापासून अटकाव करता येतो. किंवा या आजाराचा वेग कमी करता येऊ शकतो. सुरुवातीचे संकेत यासाठी ओळखता आले पाहिजेत आणि वेळेवर उपचार सुरू झाले पाहिजेत.
Dementia नव्या अभ्यासात काय
एका पत्रिकेत Current Biology नावाच्या एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. यामध्ये अल्झायमरच्या सुरुवातीच्या लक्षणांच्या बाबतीत नवी माहिती देण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी वर्चुअल रिॲलिटीच्या मदतीने दिशा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी अल्झायमरच्या निदान करण्यात मदत करू शकतात का याचा अभ्यास केला.
Dementia रिसर्च कसा केला
या अभ्यासात तीन गटांना सहभागी केले होते. 31 युवा व्यक्ती, 36 वयस्कर पण निरोगी व्यक्ती आणि 43 हलक्या मेमरी लॉस पीडित रुग्ण स्वरूपातयांचा समावेश करण्यात आला. सर्व सहभागींना वर्चुअल रिॲलिटी हेडसेट घालून एका रस्त्याने जाण्यास सांगितले गेले. या मार्गावर त्यांना वळण घेऊन एक चक्कर पूर्ण करायचा होता आणि पुन्हा मूळ जागी यायचे होते. यामध्ये दोन सरळ रस्ते आणि मध्ये एक वळण होते. सहभागींना कोणत्याही मार्गदर्शनशिवाय रस्ता पूर्ण करायचा होता. ही प्रक्रिया तीन वेगवेगळ्या परिस्थितीत अमलात आणण्यात आली.
Dementia रिसर्चचे परिणाम काय
रिसर्चमध्ये दिसून आले की ज्या लोकांना अल्झायमरची सुरुवात झाली होती ते लोक मार्ग निश्चित करताना वळणाची दिशा आणि कोपऱ्यांचा चुकीचा अंदाज बांधत होते. दिशेच्या बाबतीत सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त गोंधळात होते आणि त्यांचे निर्णय सुद्धा असंगत होते. यावरून स्पष्ट झाले की ही समस्या फक्त वाढणाऱ्या वयामुळे नाही तर अल्झायमरमुळे सुद्धा निर्माण होते.
Dementia तज्ज्ञांचे म्हणणे काय
पण 60 टक्के लोकांतील आजाराची ओळख होऊ शकते. अशात वर्चुअल रिॲलिटी टेस्ट अल्झायमरचे सुरुवातीचे लक्षणे ओळखण्यास मदतगार ठरू शकते. याबरोबरच त्यांनी असेही सांगितले की या अभ्यासात सहभागी लोकांची संख्या 50 पेक्षा कमी होती. त्यामुळे भविष्यात याबाबतीत मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्याची गरज आहे.