15.2 C
New York

Indian Economy : भारतानं रचला इतिहास! जपानला पछाडत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

Published:

भारतवासियांसाठी अभिमानाची बातमी आहे. जागतिक आर्थिक व्यवस्थेत (Indian Economy) भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. जपानला मागे (Japan) टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी ही माहिती दिली.

नीति आयोगाच्या (NITI Aayog) दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे अशी माहिती सुब्रमण्यम यांनी पीटीआयला दिली.

सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला दिला. यानुसार भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षात तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो असा विश्वास सु्ब्रमण्यम यांनी व्यक्त केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच म्हणाले होते की अॅपल कंपनीचे आयफोन अमेरिकेतच तयार झाले पाहिजेत. यावर सु्ब्रमण्यम म्हणाले की मग टॅरिफचं काय होईल याबाबत काही सांगता येणं कठीण आहे. परंतु, सध्याच्या काळात वस्तू तयार करणे भारतात जास्त किफायतशीर आहे. सरकार पुन्हा एकदा त्यांच्याकडील संपत्ती भाडोत्री देईल किंवा विक्री तरी करील. यालाच असेट मोनेटायजेशन असेही म्हणतात. याचा पुढील टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होईल. यातून सरकारला आणखी पैसे मिळतील. यातून देशाचा विकास होईल.

Indian Economy भारताला आणखी एक गुडन्यूज

फिच रेटिंग्सने सन 2028 पर्यंत भारताचा सरासरी वार्षिक वाढीची क्षमता 6.4 टक्के केली आहे. एजन्सीने याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये 6.2 टक्के आर्थिक वाढ राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. भारतीय अर्थव्यवस्थेने 2023 च्या अहवालाच्या वेळी आमचा जो अंदाज होता त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे असे फिच संस्थेने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img