17.9 C
New York

Election Commission : पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर, निवडणूक आयोगाचा निर्णय

Published:

गुजरात, केरळ (Kerala), पंजाब (Panjab) आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत निवडणूक आयोगाने (Election Commission decision)पोटनिवडणुका घेण्याचा (By elections) निर्णय घेतला आहे. आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे या मतदारसंघांमध्ये जागा रिकामी झाल्या (assembly constituencies) आहेत.

गुजरात येथील कडी विधानसभा मतदारसंघात कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे (अनुसूचित जाती) पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर विसावदर मतदारसंघात भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. केरळ राज्यातील निलांबूर मतदारसंघात पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे तर पंजाबच्या लुधियाना वेस्ट मतदारसंघात गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे पोट निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमधील कालिगंज मतदारसंघात नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे.

Election Commission निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

अधिसूचना जारी होण्याची तारीख 26 मे 2025 आहे. तर 2 जून 2025 नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख आहे. नामनिर्देशन छाननी 3 जून 2025 रोजी होणार आहे. तर 5 जून 2025 उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मतदान 19 जून 2025 आणि मतमोजणी 23 जून 2025 रोजी होऊन 25 जून 2025 निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख अशी आहे.

सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी 12 पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img