19.4 C
New York

Vaishnavi hagawane : सुनेवर घाव अन् मटनावर ताव; हगवणे बाप-लेकांचा ‘तो’ व्हिडिओ समोर

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi hagawane) आत्महत्या केली. जमीन खरेदीसाठी पैशांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिचा छळ करण्यात आला, आणि त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. अखेर सात दिवसांनंतर फरार राजेंद्र आणि सुशीलला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सहा पथकांच्या तपासानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली आहे, अशी बावधन पोलिसांनी दिली आहे. (Rajendra and Sushil Hagawane arrested CCTV footage of arresting in vaishnavi hagawane death case)

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (22 मे) मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये फरार आरोपी राजेंद्र आणि सुशील दिसले होते. राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरुन सुशील निघून गेला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, नाकाबंदी सुरू केली होती. यावेळी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण परिसरात झडती सुरू केली. अखेर शुक्रवारी (23 मे) पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बावधान पोलिसांनी पत्रकार परिषदेत घेत सांगितले की, “बावधान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील तीन जण अटकेत होते, उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गादर्शनसाठी सहा पथके तैनात करण्यात आली होती.” अशी माहिती दिली.

“आरोपींपैकी सासरे राजेंद्र हागवणे आणि दीर सुशील हगवणेला शुक्रवारी (23 मे) पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर पीसीआरसाठी हजर केले जाणार आहे. सर्व पुरावे संकलित करून घेतले जात आहेत. हे पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार केला जाणार आहे. या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एन्डला दोषसिद्धी नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत.” अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांची ही पत्रकार परिषद अवघे दोन मिनिटांत आटोपती घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img