संजय राऊत (Sanjay Raut) यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित झाले व त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. संजय राऊत हे एक राज्याला लागलेली विकृती असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलणे, लिहिणे एवढी राऊत यांची पात्रता नाही. मुंबईमधील अनेक भूखंडाचे घोटाळे जर बाहेर काढले तर एक वेगळेच पुस्तक त्यांच्यावर छापावे लागेल, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
पुढे बोलताना विखे म्हणाले, पदाचा मान आपण राखला पाहिजे. अशा विकृत माणसाविषयी आपण काय बोलावे. ज्यांनी जनाधार गमावला आहे, लोकांचा विश्वास गमावला आहे, त्यांनी अशी पुस्तके लिहिणे व प्रसिद्धीच्या झोतात राहणे एवढेच बाकी राहिले असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं.
संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ठाम मत राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविषयी भाष्य करण्यात आले आहे. आता यावरुनच राजकारण चांगलेच पेटले आहे.
Radhakrishna Vikhe Patil शरद पवारांच्या परखड भूमिकेमुळे नरेंद्र मोदींची अटक टळली…
गोध्राकांड प्रकरणात सीबीआयकडून अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागलेला होता. त्यावेळी केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं, आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. गुजरातमधील अनेकांना या दंगल प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. या प्रकरणी चौकशीची आणि कारवाईची सुई ही आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत वळली होती. यावेळी शरद पवार यांनी रोखठोक भूमिका घेत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करु नये, असं म्हटलं होतं. शरद पवार यांच्या भूमिकेला कॅबिनेटमध्ये मूकसंमती मिळाली होती. शरद पवारांच्या या भूमिकेमुळेच नरेंद्र मोदी यांची अटक टळली होती, असा दावा संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केला आहे.