18.6 C
New York

Operation Sindoor : सौदीतच ठरला ‘इस बार बडा करेंगें’ चा प्लॅन; 45 सिक्रेट बैठका अन्…

Published:

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोदींनी सैदीचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या भीषण हल्ल्याचा बदला घेण्याचा मास्टर प्लॅन मोदींनी सौदीतच तयार केला असल्याचे आणि भारतात याबाबत 45 सिक्रेट बैठका पार पडल्याचे आता सांगितले जात आहे.

Operation Sindoor सौदीतच केला होता निश्चय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियामध्येच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी यावेळी काही तरी मोठं करणार असा निश्चय मोदींनी सौदीतच घेतला होता.

Operation Sindoor 45 हून अधिक गुप्त बैठका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यासाठी मोदींनी भारतात परतल्यानंतर 45 हून अधिक गुप्त बैठका घेतल्या. ज्यामध्ये एनएसए, सीडीएस आणि तिन्ही लष्कर प्रमुख, आयबी आणि रॉ प्रमुख सहभागी होते. या बैठका पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांव्यतिरिक्त होत्या. ज्या एका गुप्त ठिकाणी पार पडल्याचे सांगितले जात आहे.

Operation Sindoor वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी वॉर रूम

पार पडलेल्या बैठकांनंतर आणि ऑपरेश सिंदूर राबवण्यासाठी ग्रीन सिग्लन मिळाल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी एक वॉर रूम उभारण्यात आले होते. या वॉररूममधून ऑपरेशन सिंदूरचे रिअल टाइम मॉनिटरिंग केले जात होते आणि मोदींना प्रत्येक क्षणाची माहिती दिली जात होती असे वृत्त टीव्ही 9 हिंदीने प्रकाशित केले आहे.

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 ठिकाणांवर हल्ले

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारतीय लष्कराने हाणून पाडला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img