17.9 C
New York

Sanjay Raut : राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते…; राऊत काय म्हणाले?

Published:

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे खासदार (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. तिथं कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, अशीच परिस्थिती आहे. मात्र, त्यांनी अनैतिक संबंध ठेऊ नये, ही आमची अट असल्याचं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊतांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. तर विधानसभा स्वबळावर लढवली होती. आणि आता ते उद्धव ठाकरेंशी युती करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं. याविषयी विचारलं असता राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतो. ते ओपनच आहे, तिथे खिचडी पण मिळते. पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत आहोत. फक्त आमची अट आणि भूमिका एकच आहे की, ज्यांनी महाराष्ट्रात द्रोहाच्या भूमिका घेतल्या, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता काम नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये, ही आमची भूमिका असल्याचं राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना राऊतांनी अजित पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, अजित पवार अमित शाहांच्या मदतीने शरद पवारांचा पक्ष पळवून नेला. ते रेम्या डोक्याचे आहेत, अशी टीका राऊतांनी केली. मी नेहमी दोन नेत्यांचा कौतुक करतो, ते म्हणजे राज ठाकरे आणि नारायण राणे. नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. राणेंनी कधीही असा दावा केला नाही की माझी शिवसेना, मीच खरा शिवसेनाप्रमुख… त्यांना पक्ष चालवता आला नाही, ते दुसऱ्या पक्षात गेल आणि त्यांनी राजकारण सुरू केलं. राज ठाकरेंनीही स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आपलं राजकारण केलं, असं राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img