9.2 C
New York

India Pakistan Tension :  PM मोदी अन् भारतीय सैन्याचा वर्मी घाव, ट्रम्प तात्यांचा पडला भाव

Published:

भारत पाकिस्ताचं युद्ध अचानक (India Pakistan Tension) थांबलं. कुणाच्या मनीध्यानी नसताना अचानक डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ट्विट करतात अन् युद्धविरामाची माहिती जगाला देतात. भारत आणि पाकिस्तानचा वाद यात अमेरिकेचं काय काम असा प्रश्न पडलेला असतानाच ट्रम्प सगळ्याच प्रकाराचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. पण, नंतर भारतीय सैन्याची पत्रकार परिषद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) भाषण होतं. यातच सगळं चित्र स्पष्ट होतं. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः पीएम मोदी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही. याच घटना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा भाव पाडणाऱ्या ठरल्या कशा ते जाणून घेऊ या..

बऱ्याचदा असं होतं की एखादी महत्त्वाची गोष्ट मागे राहून जाते आणि अनावश्यक गोष्टींचीच जास्त चर्चा होते. भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम (India Pakistan Ceasefire) झाला आहे म्हणजेच दोन्ही देशांचे एकमेकांवरील हल्ले आता थांबले आहेत. आता अनेक शांतीदूत समोर येऊन आम्हीच युद्ध थांबवलं असा दावा करू लागले आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सर्वात पुढे आहेत. नंतर चीननेही यात उडी घेतली. आम्ही दोन्ही पक्षांशी चर्चा केली या युद्धबंदीच आम्ही स्वागत करतो असे चीन आता म्हणू लागला आहे. यामागे चीनचा काय हेतू आहे हे वेगळं सांगायला नको.. पण आज आपण फक्त अमेरिकेवरच बोलू. सर्वात आधी डोनाल्ड ट्रम्प यांची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बरोबर नेमकं काय केलं हे समजून घ्या.

ज्यावेळी दोन्ही देशांच्या डीजीएमओची चर्चा झाली आणि याचा सुगावा ट्रम्प यांना लागला. लगेच त्यांनी सोशल मीडियावर येऊन आम्हीच दोन्ही देशांत समन्वय घडवून आणला, दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित केली असे सांगण्यास सुरुवात केली. आता दोन्ही देशांत तटस्थ ठिकाणी चर्चा होईल असेही सांगितले गेले. याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही काश्मीरचा (Jammu Kashmir) मुद्दा देखील सोडवू.

निवडणूक प्रचाराच्या काळात डोनाल्ड ट्रम्प नेहमीच म्हणत होते मी युद्धाच्या विरोधात आहे. राष्ट्रपती बनल्यानंतर जगात जितके युद्ध सुरू आहेत ते सगळे बंद करून टाकू असेही ट्रम्प म्हणाले होते. पण आता सत्तेत येऊन पाच महिने झाले आहेत तरी देखील रशिया युक्रेन युद्ध त्यांना (Russia Ukraine War) थांबवता आलं नाही. हमास आणि इस्राएल (Israel Hamas War) यांच्यातही युद्ध सुरूच आहे. या युद्धातही शस्त्रसंधीची घोषणा झाली होती पण ती कागदावरच राहिली.

India Pakistan Tension ..अन् पीएम मोदींना उलटवला ट्रम्पचा डाव

पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात वेगळच काहीतरी सुरू आहे. जगात एक पीसमेकरच्या रूपात आपली इमेज तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या संघर्षात त्यांना एक संधी दिसली. लगेचच त्यांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या तिन्ही सैन्य दलांच्या डीजीएमओनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचं नाव सुद्धा घेतलं नाही.

यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की घाबरलेला पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबावं यासाठी जगभरात फिरला. पीएम मोदींनी सुद्धा आपल्या संपूर्ण भाषणात अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही. दोघांच्या मैत्रीचे बरेचसे किस्से जगाने ऐकले आहेत. तरीही ट्रम्प यांनी जे काही केलं ते भारताच्या विश्वासाला तडा जाण्यासारखं आहे. या प्रकरणात अमेरिकेने ज्या पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा आपल्या देशातील विरोधकांनी घेतला. काँग्रेस तर रोज विचारत आहे की युद्धविरामात अमेरिका मध्यस्थ कसा? मोदींनी याचं उत्तर द्यावं असा धोशा काँग्रेसने लावला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर मोदींनी आधीच देऊन टाकलं होतं.

या युद्धविरामाचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही करत होते. त्याचा साधा उल्लेखही मोदींनी त्यांच्या भाषणात केला नाही. पाकिस्ताननेच आम्हाला विनंती केली. त्याचवेळी सांगण्यात आलं होतं की तुम्ही हल्ला केला नाही तर आम्हीही करणार नाही. कुणाला काही कन्फ्यूजन राहू नये यासाठी हेही सांगितलं की ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलं आहे रद्द नाही.

एका प्रकारे पीएम मोदींनी जसा डोनाल्ड ट्रम्प यांचा भाव पाडला आहे तसे करण्याची हिंमत जगातल्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने अजून तरी केलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी समजलेले नाहीत. मोदी दोस्ती निभावतात पण देशाच्या हिताशी तडजोड कधीच करत नाहीत. ही गोष्ट ट्रम्प यांच्या लक्षात आली आहे की नाही याचा अंदाज येत नाही.

India Pakistan Tension चीनचाही भारताला खिंडीत गाठण्याचा डाव

कारण अजूनही ट्रम्प दोन्ही देशांत मध्यस्थ होण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना त्यांचं कौतुक केलं. धन्यवाद दिले. पण भारतानं अमेरिका किंवा ट्रम्प यांचं साधं नावही घेतलं नाही. यात चीनचा वेगळाच उद्देश आहे. चीनला वाटतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव असाच सुरू राहावा. याचा परिणाम भारताच्या आर्थिक प्रगतीवर व्हावा. चीनमधून ज्या कंपन्या बाहेर पडत आहेत त्या भारतात येऊ नयेत असाही हेतू यामागे आहे. पण भारताने ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) स्थगित केलं ते पाहून चीनला मोठा धक्का बसला आहे. भारत सध्या ज्या स्थितीत आहे. जितक्या आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडतोय त्यावरुनही बाकीचे देश संभ्रमात पडले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img