10.7 C
New York

Operation Sindoor :  भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा शहानपणा; सायबर हल्ल्याचा डाव

Published:

भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान भारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Operation Sindoor : ) यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स, लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन केलं आहे.

भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. दहशतवादी तळांवर पाकिस्तानातील प्रमुख शहरातील भारताने अचूक हल्ले केले, त्याला विरोध म्हणून सायबर मोहीम पाकने हाती घेतल्याची माहिती आहे. माहितीनुसार, पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे.

‘डान्स ऑफ द हिलरी’ नावाचा सायबर व्हायरस व्हिडिओ, डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून पसरवला जात आहे. अज्ञात लिंकवर मोबाईल किंवा ईमेलवर आलेल्या हा व्हायरल क्लिक केल्यास गंभीर नुकसान पोहचवू शकतो. अनेक गोपनीय माहिती त्यात हॅकर्सना तुमच्या बँक क्रेडेन्शियल्ससह मिळू शकते.

Operation Sindoor कोणत्या फाईल्स धोकादायक?

Dance of the Hillary नावाने कुठलीही फाईल
अथवा व्हिडिओ लिंक आल्यास क्लिक करू नका.
.exe फॉर्मेटमध्ये आलेली अज्ञात लिंक्स
tasksche.exe नावाची फाईल्स
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळावे

Operation Sindoor काय होऊ शकते नुकसान?

तुमचे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे लीक होऊ शकतात
बँकिंग APP मधून पैसे चोरीला जाऊ शकतात
तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो
डिव्हाइसचा कॅमेरा आणि माइक रिमोटली चालू केला जाऊ शकतो

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img