14.6 C
New York

Ind vs pak war : पाकिस्तानने शरणागती पत्करली, जगाकडून कर्ज घेण्याची वेळ

Published:

भारतासोबतचे युद्ध पाकिस्तानसाठी एक ओझं बनत चाललं आहे. (Ind vs pak war) युद्धाच्या अवघ्या दोन दिवसांत पाकिस्तानची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे. (Sindoor) पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक महत्त्वाचं ट्विट पोस्ट करण्यात आलं, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक बँकेकडून तात्काळ कर्जाची मागणी करण्यात आली.

सरकारी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भारताडून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केलं आहे. वाढत्या युद्ध आणि घसरत्या साठ्यादरम्यान, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचं आवाहन करतो. राष्ट्राला खंबीर राहण्याचं आवाहन केलं जातं.

पाकिस्तानच्या या मागणीनंतर जगभरातून त्यावर टीका होऊ लागली. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने म्हटलं आहे की त्यांच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे एक्स अकाउंट हॅक झाले आहे. आम्ही ट्विटर (एक्स) बंद करण्यासाठी काम करत आहोत, असं मंत्रालयाने रॉयटर्सला सांगितले. याशिवाय, या ट्विटशी आमचा काहीही संबंध नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.

Ind vs pak war पाकिस्तान गुडघे टेकले

या ट्विटवरून स्पष्टपणे दिसून येतं की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. त्याच वेळी, त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. त्यांचं सैन्य देखील भारतीय प्रत्युत्तर हल्ल्यांमुळं तुटलं आहे. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की हे ट्विट पाकिस्तानच्या असहाय्य परिस्थितीवर प्रकाश टाकते, जिथे ते फक्त दोन दिवसांत जागतिक मदत मागत आहे.

Ind vs pak war भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्धाचा धोका

७ मे पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजू एकमेकांवर रॉकेट आणि ड्रोन डागत आहेत, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि सीमावर्ती भाग रिकामं करण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेले हल्ले भारतीय हवाई संरक्षण दलाने हाणून पाडल्याची माहिती भारतीय लष्कराने शुक्रवारी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img