19 C
New York

India on High Alert : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर, मच्छीमारांसाठी कठोर सूचना

Published:

सध्या भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे India on High Alert संपूर्ण देशभरात विशेषतः संवेदनशील भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सुरक्षेची अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. तटरक्षक दल, नौसेना, सागरी पोलिस दल, कस्टम विभाग यांच्याकडून चौकशी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. विशेषतः मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे बारीक लक्ष ठेवले जात आहे.

भारत-पाकिस्तानमधील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात कोणतीही घुसखोरी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेत कमालीची वाढ झाली. रात्रीच्या वेळेस समुद्रमार्गे होणाऱ्या संभाव्य घुसखोरीवर लक्ष केंद्रित करून यंत्रणांनी खास रणनीती आखली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागालाही याच अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना काही क्षेत्रांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः ODA (Offshore Defence Area) क्षेत्राचा समावेश आहे. हे क्षेत्र देशाच्या नौदलासाठी अत्यंत संवेदनशील मानले जाते आणि जर कोणतीही बोट या भागात आढळली तर त्वरित “शूट टू किल” म्हणजेच गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

India on High Alert सुरक्षा यंत्रणांनी मच्छीमारांना दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे:

१, ODA क्षेत्रात मासेमारी किंवा बोटी ठेवणे पूर्णतः बंद – हे क्षेत्र अत्यंत संवेदनशील असून तिथे कोणतीही बोट दिसल्यास थेट कारवाई केली जाईल. या भागात वादळांपासून बचावासाठीही थांबू नये.

२. मत्स्यव्यवसाय विभागाच्या LO (Liaison Officers) ना सहकार्य – सध्याच्या परिस्थितीत मच्छीमारांनी सुरक्षा यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. सागरी सुरक्षेसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

३. बोटींसोबत ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे ठेवावीत – कुठलीही शंका येऊ नये यासाठी बोटीवर सगळे अधिकृत कागदपत्र असणे अनिवार्य आहे.

४. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा – मच्छीमारांनी कोणतीही संशयास्पद बोट किंवा व्यक्ती दिसल्यास लगेच कळवणे अत्यावश्यक आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यांसारख्या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा अ‍ॅक्टिव्ह मोडवर आहेत. लँडिंग पॉईंट्सवरही विशेष नजर ठेवली जात आहे. समुद्रातील लहानसहान हालचालींवर देखील सतत नजर ठेवली जात आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता, मच्छीमारांनी मासेमारी करताना अधिक सतर्क राहणे, सरकारी सूचनांचे पालन करणे आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img