पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. काल पाकिस्तानने जम्मू आणि (Jammu Kashmir) अन्य ठिकाणी ड्रोन, मिसाईल हल्ले करून युद्धाला तोंड फोडले. पाकिस्तानच्या या कुरापतीला भारताने (India Pakistan War) चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत (Operation Sindoor) भारतीय सैन्य सातत्याने कारवाई (Indian Army) करत आहे. याच दरम्यान इंटरनेटवर IC 814 ट्रेंड करत आहे.
आता असा दावा करण्यात येत आहे की कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचा लहान भाऊ अब्दुल रऊफ अजहर याचा भारताच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईत अब्दुल रऊफ अजहर हा अतिरेकी मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मिरात हल्ले (Pak Occupied Kashmir) करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या मुख्यालयाचा समावेश होता. आता भारतीय जनता पार्टीने सोशल मीडियावर अब्दुल रऊफ अजहरचा फोटो आणि त्यावर समाप्त असे लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल रऊफ अजहर 1999 मध्ये कंदहारमध्ये इंडियन एअरलाइन्स आयसी 814 हायजॅक प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ला आणि 2001 मधील संसदेवरील हल्ल्यातही त्याचा सहभाग होता.
Operation Sindoor कंधार हायजॅक प्रकरण नेमकं काय ?
काठमांडू येथून नवी दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सचे विमान 24 डिसेंबर 1999 रोजी हायजॅक झाले होते. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना हरकत उल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांनी हे विमान हायजॅक केले होते. हातजॅकर्सने अनेकदा रस्ता बदलण्यास सांगितले होते. रिपोर्टनुसार आधी अमृतसर, लाहोरला विमान नेण्यात आले. यानंतर थेट दुबईला घेऊन जाण्यात आले होते. याठिकाणी 27 प्रवाशांना सोडून देण्यात आले. यामध्ये एक गंभीर जखमी बंधकाचा समावेश होते. नंतर या प्रवाशाचा मृत्यू झाला. शेवटी हे विमान अफगाणिस्तानातील कंधार येथे उतरवण्यात आले.
विमान सोडून देण्याच्या मोबदल्यात 36 दहशतवाद्यांची मुक्तता, 200 मिलियन अमेरिकी डॉलर आणि एक मयत दहशतवाद्याच्या अवशेषांची मागणी भारताकडे करण्यात आली होती. या मुद्द्यावर हायजॅकर्स, भारत सरकार आणि तालिबानच्या प्रतिनिधींची प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर तीन हाय प्रोफाईल दहशतवाद्यांना सोडून देण्यास भारत सरकारने सहमती दर्शवली. सोडून देण्यात आलेल्या दहशतवाद्यांत मौलाना मसूद अजहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांचा समावेश होता.
31 डिसेंबर 1999 रोजी उर्वरित प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांच्या मुक्ततेच्या मोबदल्यात तीन धोकादायक अतिरेकी सोडून देण्यात आले. या हायजॅकर्सना पाकिस्तानात पळून जाण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे भारत पाकिस्तान संबंधात आणखी तणाव निर्माण झाला. आता भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला कंधार हायजॅक प्रकरणाचा बदला म्हणूनही पाहिला जात आहे. याच कारणामुळे इंटरनेटवर सध्या IC 814 ट्रेंड करत आहे.