12.6 C
New York

Operation Sindoor : भारताने फक्त ‘या’ 9 ठिकाणांनाच का टार्गेट केलं?

Published:

पाकिस्तानला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी थेट पाकिस्तानात घुसून मध्यरात्रीच दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. घुफक्त पीओकेच नाही तर थेट सून हल्ले पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत केले. हे भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं खास वैशिष्ट्य. पण, 9 दहशतवादी अड्डेच भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून का उद्धवस्त केले. काय कारण होतं याच अड्ड्यांची निवड करण्याचं याची माहिती आता समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानात 9 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास बारा अतिरेकी ठिकाणांवर हल्ला केला. हे टार्गेट पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटरपर्यंत होते. या ठिकाणांची हल्ला करण्याआधी खात्री करण्यात आली होती. ट्रॅक करण्यात आले आणि एअर स्ट्राइक करुन नंतर त्यांना पूर्ण उद्धवस्त करण्यात आले.

Operation Sindoor जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्धवस्त

भारताने ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केलं त्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. तसेच लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांनाही नष्ट करण्यात आले. सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये झाला. बहावलपूर आंतरराष्ट्रीय बॉर्डरपासून 100 किलोमीटर आत आहे. याच ठिकाणी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे मुख्यालय होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img