15.4 C
New York

New ATM Charges : ग्राहकांनो, 1 मे पासून ATM च्या नियमांमध्ये होणार बदल, कारण काय?

Published:

मे महिन्याची सुरुवात येत्या दोन दिवसानंतर होणार असून देशात काही नियम या महिन्याचे पहिल्या दिवशीच बदलणार आहे. सर्वसामान्यांवर ज्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचे नियम म्हणजे एटीएमबाबत आहे. देशभरातील एटीएम व्यवहार शुल्कासाठी 1 मेपासून देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) नवीन नियम (New ATM Charges) लागू करणार आहे. या नियमांनुसार, एटीएममध्ये मर्यादेपेक्षा फ्रीमध्ये व्यवहार केला तर आता जास्त शुल्क मोजावे लागणार आहे. . एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना जास्तीचं शुल्क लागणार आहे.

आतापर्यंत एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र 1 मे पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारांसाठी 23 रुपये द्यावे लागतील. एचडीएफसी बँक, पीएनबी, कोटक महिंद्रा इत्यादी बँकांनी तर दुसरीकडे त्यांच्या ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी नवीन शुल्कांबद्दल आधीच माहिती दिली आहे. एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये तुमच्या स्वतःच्या बँकेच्या तुम्ही किती वेळा फ्रीमध्ये सर्विस घेऊ शकतो याची माहिती आरबीआयने दिली आहे.

New ATM Charges मोफत व्यवहारांची मर्यादा कुठे किती ?

महानगरांमधील ग्राहकांना महिन्याला तीन मोफत व्यवहारांचा लाभ घेता येईल. महानगराबाहेरील भागात, व्यवहारांची मर्यादा दरमहा पाच मोफत निश्चित करण्यात आली आहे. मुक्त मर्यादा आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांना या लागू होतात.

New ATM Charges नुकसान कसं टाळाल?

मात्र ग्राहकांनी केवळ मोफत मर्यादेत व्यवहार केले किंवा तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर केला या शुल्क वाढीचा तर फारसा परिणाम होणार नाही. डिजिटल पेमेंट, यूपीआय किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय वाढीव शुल्क टाळण्यासाठी अधिक वापरणे फायदेशीर ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img