15.4 C
New York

Pahalgam Terror Attack : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

Published:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता संसदेचे विशेष (Pahalgam Terror Attack) अधिवेशन बोलावण्याची विनंती काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी तसेच सामूहिक संकल्प करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही भूमिका मांडली आहे. (Pahalgam Terror Attack: Congress demands to convene a special session of Parliament)

सध्या एकता आणि ऐक्याची भावना कायम असणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावले पाहिजे, असे विरोधकांचे मत आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपला मजबूत सामूहिक संकल्प आणि इच्छाशक्ती व्यक्त करण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन बोलावले जाईल, अशी आम्हाला आशा आहे, असे खर्गे यांनी या पत्रात म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे पत्र शेअर केले आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी रात्री पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंती केली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Pahalgam Terror Attack खर्गेंनी मोदींवर केली होती टीका

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या एका रॅलीत त्यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. भाजपावर देशात फूट पाडण्याचा आरोपही त्यांनी केला होता. संकटाच्या या काळात सर्वांना एकत्र लढायचे आहे, परंतु भाजपाला विद्वेष पसरवून लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असे खर्गे म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img