19.1 C
New York

Sanjay Raut : भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करा; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना सल्ला

Published:

राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे. यावर शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज ( 21 एप्रिल ) स्पष्ट भूमिका मांडली. “भूतकाळ विसरून महाराष्ट्राच्या अन देशाच्या हितासाठी भविष्याचा विचार करा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख काही लोकांच्या नेत्यांनी एकत्र येण्याच्या संकेताने पोटात मळमळ होत आहे. शेतात आणि शाखेत त्यांना जायची वेळ येईल, अशी भीती वाटते. पण आम्ही अशा प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करत आहोत.”

Sanjay Raut मनसेकडून शिवसेनेच्या भूतकाळावर टीका

मनसेकडून शिवसेनेच्या भूतकाळावर टीका होत असताना, राऊत यांनी काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीचा दाखला देत सांगितले, “काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना भूतकाळ विसरला .हितासाठी हातमिळवणी जेव्हा करायची असते, भूतकाळाकडे तेव्हा पाहण्याचं कारण नसतं.”

Sanjay Raut संजय राऊत काय म्हणाले

संजय राऊत राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्या संकेतांवर म्हणाले, “ राज्यात इतकी चर्चा आणि प्रतिक्रिया केवळ संकेत दिल्यावर उमटत आहेत, तर प्रत्यक्षात जर हे दोन नेते एकत्र आले, तर काय होईल याची कल्पना करा” संजय राऊत यांनी मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना फटकारले. ते म्हणाले, “राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्यामधील संवाद हे फक्त त्या दोघांपुरते मर्यादित आहे. इतरांनी त्यात उगाच बोट घालू नये.”

Sanjay Raut राजकीय हालचाली वाढल्या

राज्यात राजकीय हालचाली ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवरून वाढल्या आहेत. सकारात्मक प्रतिसाद शिवसेना उबाठाकडून याला मिळत असून, ‘एकत्र येणेमहाराष्ट्राच्या भविष्यासाठी गरजेचे आहे’, असा पुनरुच्चार करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img