21.3 C
New York

26/11 Mumbai Attack : दहशतवादी हल्ल्यामागे काँग्रेसचा हात! भाजपाचा थेट आरोप

Published:

मुंबईवर झालेल्या हल्ल्यात (26/11 Mumbai Attack ) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही. मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती,’ (Congress) असं खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलं आहे. दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्यासाखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचं षड् यंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. सनातन संस्थेचे अभय वर्तक, ॲड. संजीव पुनाळेकर आणि भावे उपस्थित होते. ‘सत्ता बदलली तरी पोलीस व्यवस्था बदललेली नाही. दाभोलकर हत्या प्रकरणात शिक्षा झालेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आमच्या कामाचा बारामतीच्या काकांना राग होता असा टोलाही त्यांनी लगवाल आहे.

स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय एवढा मोठा दहशतावदी हल्ला होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यावेळी केंद्रात काँग्रेसप्रणित संयु्क्त पुरोगामी आघाडी सरकार होते तर, महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस आघाडीचे सरकार होते, हे उल्लेखनीय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन माधव भांडारी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी त्यांनी हा आरोप केला. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश तसेच एस एम कलबुर्गी यांच्या एका पाठोपाठ एक झालेल्या हत्या म्हणजे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड्यंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. राजकीय बदल देशात झाला तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यववस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असं नाही. व्यवस्था बदलण्याचं मोठं आव्हान आहे,’ असे माधव भांडारी यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img