23.3 C
New York

Crime News : देशी दारूच्या दुकानात मारामारी करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.२६ मार्च ( रमेश तांबे )

देशी दारूच्या दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी  (Crime News)करताना,पैसे देण्या- घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून, दारूच्या दुकानातील कामगाराला शिवीगाळ करून, दुकानातून पायाला धरून, दुकानाच्या बाहेर फरफटत ओढत नेऊन मारहान केल्याप्रकरणी ओतूर पोलिसांनी ( फापाळे शिवार ) येथील दोन महिलांसह सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.

याबाबत शुभम नरेश सिंग, वय २७ वर्षे, मूळ राहणार  उत्तर प्रदेश राज्य, सध्या राहणार-  गांधी बाजारपेठ ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी  १) दत्तात्रय खंडू फापाळे वय ५० वर्ष, २) संगीता दत्तात्रय फापाळे वय ३९ वर्ष ३) रोशन महेंद्र फापाळे वय ३३ वर्ष ४) राहुल महेंद्र फापाळे वय ३१ वर्ष ५) )सरस्वती गोपाळ फापाळे वय २४ वर्ष ६) विकास हरिश्चन्द्र घुले वय ४१ वर्ष सर्व रा.फापाळे शिवार, ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा- पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्री थाटे म्हणाले की,

ओतूर येथील सम्राट नावाचे सरकार मान्य देशी दारू विक्रीचे दुकान असून, सदर दुकानात शुभम सिंग हे या दुकानात कामगार असून. दि.२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सदर गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय खंडू फापाळे यांनी दुकानात जाऊन, दहा दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. परंतु सदर दुकानात काऊंटरवरील शुभम सिंग व दत्तात्रय फापाळे यांच्यात पैसे देवाण-घेवाण करण्याच्या कारणावरून भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपी दत्तात्रेय फापाळे संगीता फापाळे, रोशन फापाळे, राहुल फापाळे,सरस्वती फापाळे, विकास घुले यांच्यासह दारूच्या दुकानात जाऊन 

शुभम सिंग यांना शिवीगाळ करून, हाताने लाथांनी मारहाण करून,फिर्यादी सिंग यांना दुकानातून पायाला धरून दुकानाच्या बाहेर फरफटत ओढत नेऊन, डोक्यात खुर्ची उचलून मारली, फरशी पुसायच्या दांड्याने मारहाण केली. तसेच यातील आरोपी महिलांनी दारूचे बॉक्स व पाण्याचे बॉक्स उचलून खाली जमिनीवर फेकले.

शुभम सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओतूर पोलीसांनी आरोपींना अटक केली असून आरोपींना दि.२६ रोजी मा. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग,न्यायालय जुन्नर यांच्या समक्ष रिमांड कामी हजर केले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img