22.4 C
New York

MPSC Exam : ‘एमपीएससी’ पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध, 385 जागांसाठी ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Published:

स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC Exam) राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025′ चे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC preliminary exam 2025) – 2025 ही 385 पदांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहेत.

एकूण रिक्त जागांमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या (राज्य सेवा) 127 जागा, महसूल आणि वन विभागाच्या 144 जागा, तर सार्वजनिक बांधकामा विभागाच्या 114 जागा आहेत. 28 मार्च 2025 पासून या परिक्षेसाठी अर्ज करण्यास सुरूवात होणार आहे. तर 18 एप्रिल 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत आहे. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 17 एप्रिल 2025 असणार आहे.

दरम्यान 19 एप्रिल 2025 पर्यंत भारतीय स्टेट बॅंकेत परीक्षा शुल्क (MPSC PRELIMS NOTIFICATION 2025) भरण्यासाठी प्रत घेण्याची मुदत आहे. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत 21 एप्रिल 2025 बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत असणार आहे. परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी आणि अजून अधिकृत माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ आणि गट-ब परीक्षा योजनेतील सुधारणेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं. राज्य सेवा मुख्य परीक्षेकरीता सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन 2025 पासून घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेपासून लागू करण्यात येईल, यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर 23 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात देखील आलं होतं. 2025 ची मुख्य परीक्षा लेखीच होणार असल्याची माहिती मिळतेय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img