प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 रोजीपासून महाकुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येतील, असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs), यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या देखील महाकुंभ मेळा 2025 (Mahakumbh Mela 2025) मध्ये सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी लॉरेन प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरातत्या निरंजनी आखाड्याच्या मुक्काम करणार आहेत.
कल्पवास ही हिंदू परंपरेतील एक प्राचीन प्रथा आहे. ज्याला कल्पवासी किंवा कल्पवसिष्ठ म्हणतात. हा उत्सव पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो. कल्पवासी दररोज गंगेत स्नान करतात. धार्मिक प्रवचन ऐकण्यासाठी कुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) आणि भजन-कीर्तनात सहभागी होण्यासाठी विविध तत्त्वज्ञ आणि संतांच्या शिबिरांना भेट देतात. स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या निरंजनी आखाड्याच्या ‘महामंडलेश्वर’ स्वामी कल्याणानंद यांच्या शिबिरात राहतील.
महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. लोक या महामेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. 12 वर्षांतून एकदा होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. या मेळ्यात अनेक नामवंत व्यक्तीही सहभागी होणार आहेत. याशिवाय यावेळी श्रद्धेने संगमात स्नान करण्यासाठी देश-विदेशातील श्रीमंत महिलाही येत आहेत. ज्यामध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स,अॅपलचे सह-संस्थापक सुधा मूर्ती इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापक आणि सावित्री देवी जिंदाल ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन यांचा समावेश आहे.