24.7 C
New York

Junnar : उदापूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या; खाजगी सावकारकीचा बळी ?

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.२८ डिसेंबर ( रमेश तांबे )


जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील एका तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळुन, गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रकाश ( पप्पू ) दत्तात्रय सस्ते वय.३३ रा.उदापूर ता.जुन्नर,जि.पुणे  असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. प्रकाश सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी असून,बुधवार दि.२५ रोजी सस्ते यांनी घरापासून थोड्या अंतरावर चिक्कूच्या झाडाला दोरीच्या साह्याने फाशी घेतल्याची घटना घडली आहे.  दरम्यान प्रकाश सस्ते यांनी खाजगी सावकाराच्या जाचाला,त्रासाला कंटाळून, त्यांनी आपले जीवन संपवले आहे का ? अशी चर्चा उदापूर आणि परिसरात ऐकू येत आहे.

प्रकाश सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी होते.त्याला एक एकर शेती होती तसेच तो खंडाने सात एकर शेती करीत होते.शेती कमी असल्याने, तो शेतीसह जोडधंदा म्हणून पशुपालन (गाई पालन) करून दुग्ध व्यावसाय ही करायचा.शेतीसाठी आणि दुधाच्या व्यवसाय करण्यासाठी त्याने जमिनीवर पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते.तसेच त्याने काही खाजगी सावकारांकडूनही पैसे घेतले होते.गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कोसळले असल्याने त्याचे आर्थिक गणीत कोलमडले होते.त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी त्याने आठरा गाईंपैकी पैकी दहा गाई विकल्या पण होत्या.मात्र तरी ही कर्जाचा बोजा वाढतच चालला होता.त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे कसे होणार ? याची चिंता त्यास होती.

आपले आई,वडिल,भाऊ,पत्नी, दोन लहान मुले यांचे भविष्यात कसे होणार याची चिंता त्यास सतावत असल्याने, गेले काही दिवसापासून सस्ते हे तनावात व आर्थिक विवंचनेत होते.याच तणावा खाली त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज सर्वाकडून व्यक्त केला जात आहे.

प्रकाश सस्ते यांना, त्यांनी घेतलेल्या कर्जासाठी कोण त्रास देत होते का ? सस्ते यांना मागील काही महिन्यांपूर्वी कोणत्या खाजगी सावकाराने दम देऊन, गाडीत नेऊन मारहाण केली ? हे अनेक प्रश्न  अनुत्तरीत आहे.

पोलिसांनी या घटनेत लक्ष घालून, सखोल तपास केल्यानंतर पूर्ण सत्य बाहेर येईल ! असा विश्वास येथील नागरिकांना आहे.

जुन्नर तालुक्यातील बागायतीदार शेतकरी गेल्या काही वर्षांपासून बाजारभाव व नैसर्गिक आपतीमुळे अडचणीत आले आहे. याचे हे जीवंत उदाहरण आहे.या आधी ही तरूण शेतकर्‍यांनी कर्ज बाजारी पणाला कंटाळुन आत्महत्या केल्याची उदाहरणे तालुक्यात घडली आहे.

        या घटने बाबत ओतूर पोलीसांना मयताचे वडिल दत्तात्रय महादू सस्ते यानी खबर दिली असून पोलीसांनी आकस्मीत मयत म्हणुन नोंद केली आहे. पुढील तपास ओतूर  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एल.जी.थाटे हे करीत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img