1.9 C
New York

AUS vs IND : ॲडलेडमध्ये टीम इंडिया धावांवर 180 ऑलआऊट ; स्टार्कचा कहर

Published:

भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यात शुक्रवारपासून दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय शेर 180 धावांवर डेर झाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. त्याची कसोटी कारकिर्दीतील हा पंधरावा पंजा आहे. कमिन्स आणि बोलंडने 2-2 विकेट घेतल्या. भारतीय संघ ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात 180 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कनं त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताची दुसरी विकेट केएल राहुलच्या रूपानं पडली. तो 64 चेंडूंचा सामना केल्यानंतर 37 धावा करून बाद झाला. राहुलनं या खेळीत 6 चौकार मारले. विराट कोहलीच्या रुपात भारताची तिसरी विकेट गेली. तो अवघ्या 7 धावा करून परतला. मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताची दुसरी विकेट केएल राहुलच्या रूपाने पडली.

AUS vs IND कर्णधार रोहित फ्लॉप –

शुभमन गिल आणि राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी रचली गेली. पण ते फार काळ टिकू शकले नाही. शुभमन 51 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार मारले. ऋषभ पंतने 35 चेंडूंचा सामना करत 21 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ३ धावा करून बाद झाला. त्यांना विशेष काही करता आले नाही. अश्विनने 3 चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या. हर्षित राणाला खातेही उघडता आले नाही.

AUS vs IND नितीश रेड्डीने दिले चोख उत्तर

एकाबाजूला विकेट जात असताना नितीश रेड्डी संधी मिळेल तशी फटकेबाजी करत होता. नितीशने बुमरासह मोठे फटके मारले. बुमराह काही वेळ मैदानात राहिल्यानंतर 8 चेंडू खेळून आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद सिराज आला. सिराजने चौकार ठोकला. भारताने यासह 180 धावा पूर्ण केल्या. स्टार्कने नितीश रेड्डीला ट्रॅव्हिस हेड याच्या हाती कॅच आऊट केलं. नितीशने 54 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह सर्वाधिक 42 धावा केल्या. तर मिचेल स्टार्कने 14.1 ओव्हरमध्ये 48 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या. स्टार्कची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच पॅट कमिन्स आणि स्कॉट बॉलँड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

AUS vs IND मिचेल स्टार्कचे 6 विकेट

मिचेल स्टार्क भारतासाठी जीवघेणा ठरला. त्याने 14.1 षटकात 48 धावा देत 6 बळी घेतले. त्याने 2 मेडन ओव्हर्स घेतले. कर्णधार पॅट कमिन्सने 2 बळी घेतले. त्याने 12 षटकात 41 धावा दिल्या. स्कॉट बोलंडने 13 षटकांत 54 धावांत 2 बळी घेतले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img