27.9 C
New York

Pune Traffic : पुणे-सोलापूर मार्गावर वाहतुकीत बदल! आज कोणते रस्ते बंद, कोणते सुरू?

Published:

सोलापूर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत (Pune ) आज मोठा बदल करण्यात आला आहे. शुक्रवार रात्री आठ वाजल्यापासून एम.पी. पेट्रोल पंपाजवळ जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होईल. पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहतुकीसाठी या कामासाठी काही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. हे बदल पुढील दोन दिवस लागू असतील, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.पहिला टप्पा पुणेकडून सोलापूरकडे जाणार्‍या रोडवर व दुसर्‍या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणार्‍या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

Traffic जलवाहिनी टाकण्याचे काम दोन टप्प्यांत

जलवाहिनी टाकण्याचे काम हे दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्प्यात पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे- सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे, असे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.

असा आहे वाहतूक बदल

सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रोड मम्मादेवीमार्गे स्वारगेटकडे जाईल, यात कोणताही बदल नाही.

स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी असून, डावीकडे वळून बिशप सर्कल उजवीकडे वळून सोलापूर रोडला जातील. सदर मार्ग हा वन वे करण्यात येत आहे.

सोलापूरवरून येणार्‍या वाहनांना बंदी असून, सदर वाहने ही सरळ मम्मादेवी गोळीबार चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून डॉ. कोयाजी रोडने येणारी वाहने खाणे मारुती चौक पुलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील.

सोलापूरकडून येणारी वाहने मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी असून, ती गोळीबार चौक सरळ व उजवीकडे वळून कॅम्पमार्गे इच्छितस्थळी जातील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img