महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर (Assembly Election) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याचे निकाल 23 नोव्हेंबरला सर्वांना माहीत होतील. पण त्याआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत एक मेटेरिझचा सर्व्हे समोर आला असून , राज्यात कोणाचे सरकार बनणार आहे, महायुती की महाविकास आघाडी? या सर्व्हेतून काही गोष्टींचा अंदाज आला आहे.
मेटेरिझच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (सपा) यांना धक्का बसणार आहे.
पृथ्वीराज चव्हाणांना या निवडणुकीत धडा शिकवा; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Assembly Election कोणाला किती मते मिळतील ?
मतांच्या संख्येत सत्ताधारी महायुती आघाडी विरोधकांना मागे टाकण्याची शक्यता आहे. भाजप आघाडीला 47 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात, इतरांना 12 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.
Assembly Election कोणासाठी किती जागा आणि कुठे?
Materise ने केलेल्या सर्वेक्षणात, भाजपला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि ठाणे-कोकण भागात प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याचे दिसते, जेथे त्यांना अनुक्रमे 48%, 48% आणि 52% मते मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा सारख्या भागात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील MVA ला 47% आणि 44% मते मिळण्याची शक्यता आहे.
10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरच्या कालावधीत अनेक लोकांकडून घेतलेल्या मताचे हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात राज्यातील 1,09,628 लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये 57 हजारांहून अधिक पुरुष, 28 हजार महिला आणि 24 हजार तरुणांच्या मतांचा समावेश आहे.