14.6 C
New York

Ajit Pawar : अजित पवार यांनी सांगितले बारामतीचे गणित

Published:

विधानसभा निवडणुकीत मतदानाला आता दहा दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे प्रचाराला जोर वाढला आहे. राज्यात अनेक बड्या नेत्यांचा सभा होत आहे. त्यावेळी सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघातील निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये काका अजित पवार (Ajit Pawar)पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. सुनैत्रा पवार-सुप्रिया सुळे लढत लोकसभेला भावजय-नणंद रंगली होती. त्यामुळे विधानसभेत काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी बारामतीमधील लढतीबाबत मत व्यक्त केले आहे. बारामतीत आपणास लाखांच्या पुढे लीड असणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar बारामतीकर द्विधा मनस्थितीत

बारामतीकरांची द्विधा मनस्थिती आहे. माझी त्यांना विनंती आहे लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान केले. आता विधानसभेत मला मतदान करतील. बारामतीमध्ये सगळ्यात जास्त काम ही माझ्या कारकिर्दीत झाली आहे. माझ्या बरोबरच अनेक जणांनी कामाला सुरुवात केली आहे. गावातील राजकारणात आपल्या आपल्या वाद आहेत. त्याबद्दल मला चांगले माहिती आहे. पण ते वाद आता पुढे आणू नका. मला गावच्या वादाचा फटका बसू देवू नका.

“उद्धव आजारी पडला तेव्हा मी पहिल्यांदा..” राज ठाकरेंनी सांगितला जुना प्रसंग

पवार साहेबांच्या वयाचा विचार करुन सुप्रिया सुळे यांना लोकसभेला तुम्ही निवडून दिले. या वयात सुप्रिया सुळे यांचा झालेला पराभव त्यांना आवडणार नाही. म्हणून तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला. करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील यांच्या भाषेत केला आणि आम्ही तो स्वीकारला. परंतु आता माझ्याकडे बघून निवडणुकीत सहभागी व्हा. लोकसभेला साहेबांना खुश करण्यासाठी सुप्रियाला मतदान केले. मला खूश करण्यासाठी तसे मतदान करा, असे अजित पवार यांनी म्हटले.

Ajit Pawar महायुतीला किती जागा मिळणार

महायुतीला १७५ पेक्षा जास्त जागा मिळणार आहे. आम्ही सर्व महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहे. आम्ही तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष आहे. आमचे नियोजन झाले आहे. त्यासाठी चर्चा झाली आहे. अमित शहांसोबत कोणाच्या सभा कुठे घ्यायच्या ही चर्चा झाली आहे. साहेब एका बाजूला मी एका बाजूला आहे. मी अनेकांना पद दिली आहेत. बारामती तालुक्याचा वेगळा जाहीरनामा केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img