11 C
New York

Maharashtra Elections : निवडणुकीच्या अनुषंगाने ओतूर पोलिसांचा रूट मार्च

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.८ नोव्हेंबर ( रमेश तांबे )

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections) अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी,ओतूर पोलिसांकडून गुरूवार दि.७ रोजी ओतूर शहरात रूट मार्च काढण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ओतूर शहरात आणि पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून,नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलीसांनी गुरूवार दि.७ रोजी रूट मार्चचे आयोजन केले होते.नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी नागरिकांना केले आहे.

सदर रूट मार्चचेचे आधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ताच्या अनुषंगाने सुचना देण्यात आल्या. 

हा रूट मार्च हा ओतूर पोलीस स्टेशन येथुन सुरू करून, ओतूर शहर मार्गे, पिंपरी पेंढार ,डिंगोरे ,मढ या गावात सायंकाळी पाच ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान रूट मार्च घेण्यात आला सदर वेळी ओतूर पोलीस स्टेशनचे  अधिकारी,१५ पोलीस अंमलदार, जुन्नर विभागातील आरसीपी प्लाटून १ व २ मधील एकूण २० पोलीस अंमलदार, सीआय एस एफ प्लाटूनचे २५ जवान असे एकुण ६० पोलिस अंमलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img