11 C
New York

Amit Shah : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? शिराळ्यात अमित शहांनी भर सभेत दिले संकेत

Published:

राज्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज रिंगणात उतरले आहेत. राज्यात प्रचार शिगेला पोहोचलाय, मतदान तोंडावर आलंय. आज धुळे जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये (Shirala)जाहीर सभा पार पडली. या सभेत शाहंनी एक विधान केलंय, ते जास्तच चर्चेत आलंय. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) मोठं विधान केलंय. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली आहे.

सभेत बोलताना अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावं म्हणून त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना एक महत्वाची निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी दौरा केलाय. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे, अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचं अमित शाह भर सभेत म्हणाले आहेत.

मविआच्या गाडीला ‘ना चाक ना ब्रेक’, पहिल्या प्रचारसभेत मोदींचा ‘प्रहार’

अमित शाह यांनी शिराळ्यातील सभेत बोलताना जनतेला अनेक आश्वासनं दिलीत. यावेळी त्यांनी एक मोठा सवाल केला की, शरद पवारांकडे 10 वर्ष सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं? पंतप्रधान मोदींनी मात्र देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी खोलली, असा अमित शाहंनी दावा केलाय. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केलीय.

या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. परंतु सत्ता आल्यास राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजून महायुतीचे धोरण समोर आलेलं नाही. मात्र सध्याच्या विधानसभेत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदावर आहेत. त्यामुळे भर सभेत अमित शाह यांनी केलेल्या आजच्या वक्तव्याला चांगलंच महत्व आलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img