11 C
New York

Prakash Ambedkar : धोका धर्माला नाही, आरक्षणाला; प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींना दिला गंभीर इशारा

Published:

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar) यांनी देखील ओबीसी बांधवांना एक महत्वाचा इशारा दिलाय. ते म्हणाले की, ओबीसी सावधान! जरांगे पाटील यांनी शरद पवारांची घोषणा, दोनशे आमदार विधानसभेत असतील, याच्या अंमलबजावणीला सुरूवात (Assembly Election 2024) केलीय. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा, असं म्हणत त्यांनी सर्वांना अर्ज भरायला लावले. निझामी मराठ्यांच्या बैठका झाला. निझामी मराठ्याने काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी असे उमेदवार उभे करून घेतले. उरलेल्या ठिकाणी ‘मराठा विरूद्ध मराठा’ असं चित्र त्या ठिकाणी उभं करण्यात आलंय.

या बैठकांमध्ये मराठा आमदार कसे निघतील, याचीच रचना करण्यात आली. आता या खेळीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे एकत्र आहेत, हे ओबीसींनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. हे लक्षात घेतलं नाही तर आपण हुकणार, अशी आताची परिस्थिती असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांचा निर्णय झालाय की, मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिलं पाहिजे. आता ओबीसीने स्वत:चं आरक्षण वाचवण्यासाठी भूमिका हीच घेतली पाहिजे की, ओबीसीचं मत हे ओबीसीला, एससी आणि एसटीला द्यायचं. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीत असलेल्या मुस्लिम उमेदवारांना द्यायचं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

तानाजी सावंतांसाठी CM शिंदे मैदानात; उद्या परांड्यात शिंदेंची तोफ धडाडणार

ही भूमिका आपण बजावली तरच ओबीसीचे उमेदवार निवडून येतील हे आपण लक्षात घ्या. एक प्रचार निश्चितपणे केला जाणार आहे, तो म्हणजे धर्म संकटात आहे. हिंदू धर्म संकटात आहे. आपण आपल्या पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का? असा सवाल आंबेडकरांनी ओबीसी बांधवांना केलंय. पूर्वजांचा हिंदू धर्म मुघलांच्या काळात सोडला नाही, तो स्वत:च्या काळात का सोडणार, असा सवाल त्यांनी केलाय. ही चर्चा निरर्थक आहे. ती हिंदू महासभा, बजरंग दल यांच्यामार्फत केली जातेय. आपण त्यांना पहिल्यांदा विचारा की, ओबीसीच्या आरक्षणाला समर्थन का करत नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्माला धोका नसून आरक्षणाला आहे. स्थानिक स्वराज संस्था सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आल्या आहे. उद्या विधानसभेच्या माध्यमातून इथलं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण थांबवलं जाईल. हे मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु परंतुची चर्चा न करता आपण वंचित बहुजन आघाडीने उभे केलेल्या ओबीसी, एससी आणि एसटी उमेदवारांना डोळे झाकून मतदान करा, की त्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे, असं आवाहन ओबीसी बांधवांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img