11 C
New York

Assembly Election : जुन्नर विधानसभेसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Published:


ओतूर,प्रतिनिधी:दि.४ नोव्हेंबर ( रमेश तांबे )


जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक (Assembly Election) निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे व सहायक निवडणूक अधिकारी डॉ सुनील शेळके यांनी अर्ज माघारी च्या तसेच चिन्ह वाटप करण्याच्या दिवशी अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.


यामध्ये १७ पैकी सहा उमेदवारांनी माघार घेतली असून प्रमुख ११ उमेदवारांमध्ये जुन्नर विधानसभा निवडणुकीची लढत रंगणार आहे.
मतदान अनुक्रमणिकेनुसार अतुल बेनके सर्वात पहिल्या स्थानी असून सत्यशील शेरकर, देवराम लांडे हे अनुक्रमे दोन व तीन क्रमांकावर आहेत त्यानंतर अपक्ष उमेदवार आकाश आढाव, आशाताई बुचके, रमेश हांडे, राजेंद्र ढोमसे, शरद  बाबासाहेब सोनवणे, शरद भिमाजी सोनवणे, शरद शिवाजी सोनवणे व सुखदेव खरात असा क्रम मतदान यादीमध्ये राहणार आहेत.

विकास कामांमुळे आंबेगावची विशेष ओळख : दिलीप वळसे पाटील


तर अपक्ष उमेदवार जुबेर शेख, योगेश तोडकर, काळू गागरे, रमेश उर्फ भास्कर रामचंद्र पाडेकर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे, निलेश भुजबळ या सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे व डॉ. सुनील शेळके यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img