11 C
New York

Manoj Jarange : समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा ; मनोज जरांगे पुन्हा कडाडले

Published:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जरांगे पाटील (Manoj Jarange) आज अंतरावाली सराटीतून उमेदवारांची घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्ष गांभीर्याने पाहात (Assembly Election 2024) आहेत. आज सकाळी अंतरवाली सराटीतून जरांगे यांनी यांसंबधी रूपरेषा मांडली आहे.

राज्यातले सगळे उमेदवार आले आहेत. आज आम्ही निर्णय घेणार आहोत. कोण कोण उमेदवार आहेत? यासंदर्भात मतदारसंघाचा निर्णय घेणार आहोत. आमच्यापुढे मोठा राक्षस आहे, त्याची वाट लावायची आहे. जिथे निवडून येणार तिथेच ताकद लावायची.त्याचठिकाणी उमेदवार उभे करायचे. जिथे आपली ताकद नाही, तिथे पाडून टाकायचे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलंय. जो कोणी बॉण्डवर लेखी लिहून देईल, त्यांच्याशी आज आम्ही मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहोत. आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. एखाद्या जिल्ह्यात जागा दिली,तर सगळ्यांनी त्याचं काम करायचं अन् गुलाल घेऊन यायचा, असं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलंय.

मविआत मैत्रीपूर्ण लढती? राऊतांचं वक्तव्य महायुतीचं टेन्शन वाढवणार..

आपल्याला पडून समाजाची नाराजी घ्यायची नाही. दहा-पाच जण हक्काचे आपल्याला करणं गरजेचं आहे. जातीसाठी दहा,वीस का होईना आधार करायचा आहे. त्यांच्या नादामुळं आमच्या पोरांना नाद लागला. आम्हाला यांना चार घरं बसायचे करायचे आहेत. आमचा असला म्हणजे दार उघडून जाता येईल. मला यांना आधार करायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका जातीचं काम करा. समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा असं मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीमध्ये म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी बेजार केल्यामुळे मी लढच आहे. अन्यथा आम्हाला नाद नाहीये. आमचे मराठे शंभर टक्के एकत्र राहणार, असाही जरांगेंनी दावा केलाय. नवीन असल्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. यावेळी बोलताना जरांगे यांनी आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असं सूचक वक्तव्य केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img