10.6 C
New York

Ajit Pawar : अजित पवारांची चौथी यादी जाहीर, मलिकांच काय?

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार (Ajit Pawar) गटाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र भुयार मोर्शीमधून तर शंकर मांडेकर यांना भोर मतदारसंघातून (Ajit Pawar) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

चौथी यादी अजित पवार गटाची जाहीर करण्यात आली असून 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा चौथ्या यादीत करण्यात आली आहे. देवेंद्र भुयार यांना मोर्शीमधून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांना देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी पाठिंबा दिला होता. आता अजित पवार गटाचे भुयार राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार आहेत. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना…, ‘मोर्शी’ मध्ये मैत्रीपूर्ण लढत की अजितदादांची माघार?

Ajit Pawar नवाब मलिक आज अर्ज भरणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. पण, नवाब मलिकांच्या नावाचा समावेश या चौथ्या यादीतही करण्यात आलेला नाही. अशातच आपण यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं नवाब मलिकांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. पक्षानं तिकीट दिलं नाहीतर, आपण अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असं नवाब मलिकांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. आज नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अपक्ष लढणार की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढणार? हे अद्याप अस्पष्ट असून मलिक नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img