17.2 C
New York

Sujay Vikhe allegation : मला मारण्यासाठी थोरातांनीच हे सर्व कटकारस्थान रचले; सुजय विखेंचा गंभीर आरोप

Published:

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सुजय विखे (Sujay Vikhe allegation) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील संघर्ष पेटलेला आहे. फक्त कुटूब आहे असे म्हणून चालत नाही, तर जबाबदारी पाडावी लागते. आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका, आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी तुमच्या मुलीला न्याय मिळाला, पण गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहीणीची माफी कोण मागणार? असा परखड सवाल उपस्थित केलाय. आभोरे आयोजित केलेल्या सभेत डॉ. विखे पाटील यांनी आज लाव रे तो, व्हीडीओमधून कॉंगेस कार्यकर्त्यांनी गाड्या जाळण्याच्या कृत्याचा घटनाक्रम दाखवला. मला मारण्यासाठी आमदारांचे बंधू इंद्रजित थोरात यांनीच हे सर्व कटकारस्थान रचले असल्याचा थेट आरोप केला.

डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यचा निषेध तसेच विखे पाटील (BJP) कुटूबांच्या वतीने दिलगीरी व्यक्त करून डॉ. विखे पाटील म्हणाले की, जो व्यक्ती बोलला तो आता जेलमध्ये आहे. पण आमच्या सभेसाठी आलेल्या महीलांना मारहाण करणारे कॉंग्रेस कार्यकर्ते उघडपणे तालुक्यात फिरत आहेत. आमची संस्कृती काढून राज्यात बदनामी केली. पण आमच्या मतदार संघात येवून वडीलांबद्दल वाटेल ते बोलता. ज्याची ग्रामपंचायतीमध्ये निवडवून यायची लायकी नाही, ते बोलतात. दरम्यान या तालुक्याचे आमदार हसतात ही तुमची संस्कृती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

वसुबारस म्हणजे काय?, हा सण का साजरा करतात?

आमच्या तालुक्यात येवून आरोप झाले तरी एक सायकलसुध्दा आम्ही जाळली नाही. आमची सहनशीहता कमजोरी समजू नका. आमच्यावर लोकशाही मानण्याचे संस्कार आहेत. वडीलांवर बोललो तर डॉ. जयश्री ताईंना (Congress) खूप लागले. पण माझ्या वडीलांवर तुम्ही बोलता हे तीन वर्ष आम्ही सहन केले. पण आता पुन्हा बोललात तर माझी कशाचीही तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अंधारातून तुम्ही युवक आणि महीलांना मारहाण केली. अरे उजेडात येवून हल्ले करा. गाड्या पाठवता, हत्यार घेवून पाठवता. तुम्ही तुमच्या तालुक्यातील जनतेवरच हल्ले करता. ते कोणी दुसरे नाहीत प्रेमापोटी सभेला आले होते. पण तुम्हाला ते सहन झाले नाही. या तालुक्यात परीवर्तन घडवायचे असेल तर दडपशाहीच्या विरोधात गावोगावी गनिमावा करून पेटून उठावे लागेल. आज जी आग माझ्या गाडीला लागली, ती तुमच्या घरापर्यत येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळेच परीवर्तन करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन सुजय विखेंनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img