17.2 C
New York

 Jayashree Thorat : जयश्री थोरात यांचं पोलीस स्टेशनबाहेर बसून आंदोलन, संगमनेरमध्ये तणाव

Published:

संगमनेरमध्ये जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. वसंतराव देशमुख यांनी थोरातांच्या मुलीवर टिका करताना पातळी सोडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपची सभा सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभा बंद पाडली. सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या सभा आटोपून परत जाणा-या अडवल्या गेल्या.चिखली गावाजवळ या गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ करण्यात आली आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. अद्यापही रात्री दहा वाजेपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन सुरूच आहे. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि त्यांचे पती डॉ. सुधीर तांबे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्या समोरच बसून आहेत. बाळासाहेब थोरात यांची कन्या आणि बहिणीने पूर्ण रात्र काढली पोलीस ठाण्यासमोर बसून काढली आहे. पोलिसांनी गुन्हा दखल करण्यास विलंब केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सदर घटनेनंतर रात्री दहाच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 7 तास हे आंदोलन सुरू असून पहाटे पाच पर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आलं असून तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेनंतर धांदरफळ गावांमधील अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सभास्थळी धाव घेतली. या वेळी महिलांनी सुजय विखेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप केला. याप्रसंगी विखे यांनी भाषण आटोपते घेतले. तसंच, देशमुख यांनाही भाषण संपवण्यास सांगितलं. सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपवून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे आणि देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ उडाला.

सुजय विखे काय म्हणाले?

सदर घटनेनंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सुजय विखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखे यांनीही निषेध केलाय. ताई म्हणून मी त्यांना संबोधलं, सुजय विखेंनी महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं म्हटलंय. सुजय विखे यांनी मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी देखील केली. तसंच, आमच्याबद्दल चुकीच वक्तव्य केलं, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img