17.2 C
New York

Dhananjay Munde : धनंजय मुंडेच्या मतदारसंघात न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Published:

औरंगाबाद खंडपीठाने परळी मतदारसंघातील 112 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील घोषित करा, असे निर्देश दिले (Dhananjay Munde) आहेत. मतदान केंद्रांवर या अतिसंवेदनशील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एसआरपीच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने निवडणूक आयोगाला परळीतील 112 मतदार केंद्र ही अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावीत, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, या निर्देशाची अंमलबजावणी करुन न्यायालयात शपथपत्र दाखल करावे, असेही निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे.

Dhananjay Munde कराड रिंगणात उतरणार

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं स्थान आहे. या मतदारसंघावर आतापर्यंत मुंडे घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीत भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यंदा पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यामुळे धनंजय मुंडे हे अजित पवार गटाकडून परळी मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटातून कोण उभे राहणार, याबद्दल उत्सुकता आहे. फुलचंद कराड शरद पवार गटाकडून परळीतून भगवान सेनेचे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार गटाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, मनसेकडून दुसरी यादी जाहीर

भाजपच्या पंकजा मुंडे यांना जरांगे आणि मराठा फॅक्टरमुळे निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभे होते. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे बीड लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. तसाच प्रकार आता परळी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो.

Dhananjay Munde बुथ कॅप्चरिंगचा आरोप

लोकसभा निवडणुकीवेळी बीड लोकसभा मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बीडमधून बुथ कॅप्चरिंगच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसंच, मतमोजणीवेळीही केंद्रावर जोरदार राडा झाला होता. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा अनुभव लक्षात घेऊन परळी विधानसभा मतदारसंघातील 112 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्याचा इशारा दिला असावा, अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img