11.5 C
New York

Amit Thackeray : अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, मनसेकडून दुसरी यादी जाहीर

Published:

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने (MNS) आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादीमध्ये 45 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर भांडुप पश्चिममधून शिरीष गुणवंत सावंत आणि वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात यावेळी आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या लढत होणार आहे. तर अविनाश जाधव यांना ठाणे शहर, संगिता चेंदवणकर यांना मुरबाड, साईनाथ बाबर यांना हडपसर आणि मयुरेश रमेश वांजळे यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून किशोर शिंदे, बोरीवलीमधून कुणाल माईणकर, दहिसरमधून राजेश येरुणकर, कांदिवली पूर्वमधून महेश फरकासे, मानखुर्द-शिवाजीनगरमधून जगदीश खांडेकर तर ऐरोली मतदारसंघातून निलेश बाणखेले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img