9.9 C
New York

Pune News : पुण्यातील मतदान केंद्रांत वाढ करा; जिल्हा निवडणूक विभागाचे केंद्रीय आयोगाला पत्र

Published:

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी निश्चित (Pune News) करण्यात आलेल्या ८ हजार ४१७ मतदान केंद्रांत नव्याने ४५ मतदान केंद्रांची वाढ करण्यात यावी, असे पत्र पुणे जिल्हा निवडणूक शाखेने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविले (Election Commission) आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी दीड मतदार असतील, असे नियोजन याआधी असायचे. ती संख्या आता एक हजार ते बाराशेपर्यंत कमी करून केंद्रांची संख्या वाढविण्याचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानंतर आज या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून मतदानाची तयारी केली जात आहे. मतदान केंद्रांची पाहणी, तेथील व्यवस्था या गोष्टींवर भर दिला जात आहे. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्यात येत असून त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.

मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदान करता यावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यातच पुणे निवडणूक विभागाने आणखी काही मतदान केंद्र वाढविण्याची मागणी केली आहेत. तसे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी दीड मतदार असतील, असे नियोजन याआधी असायचे. ती संख्या आता एक हजार ते बाराशेपर्यंत कमी करून केंद्रांची संख्या वाढविण्याचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मुश्रीफ, तटकरे, मुंडे, भुजबळांवर सोपवली जबाबदारी…

निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे. आता जिल्हा निवडणूक विभागाच्या पत्रावर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार, मतदान केंद्र वाढविण्याची मागणी मंजूर होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune News कोणत्या मतदारसंघात किती मतदान केंद्रे वाढणार?

दौंड : ३, आंबेगाव : ५, चिंचवड : ३, पुरंदर : ५, भोसरी : ९, वडगावशेरी : ११ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात दोन मतदान केंद्र वाढविण्यात यावीत अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. आता जिल्हा निवडणूक विभागाच्या पत्रावर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार, मतदान केंद्र वाढविण्याची मागणी मंजूर होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img