17.2 C
New York

Maharashtra Rain : आज तुफान बरसणार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Published:

राज्यासह देशभरातून मान्सूनने माघार (Maharashtra Rain) घेतली आहे. या काळात काही राज्यात जोरदार पाऊस होत (Heavy Rain) आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाण परतीचा पाऊस बरसला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात (Rain Alert) आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पु्णे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल (Pune Rains) असा अंदाज आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. पावसाच्या काळात काळजी घ्या.

अर्ज भरायला 6 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस

मराठवाड्यात आता पावसाचा जोर ओसरअर्ज भरायला 6 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवसला आहे. मान्सूनने माघार घेतली आहे. तरी देखील आज येथील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला होता. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला होता. जुलैनंतरही पुढील काही महिन्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा राज्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img