19.9 C
New York

Jayant Patil : शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांचा मुश्रीफांवर वार

Published:

एक नेते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार हे फक्त एकदाच कागल मतदारसंघात येऊन गेले. तो ट्रेलर होता. (Jayant Patil) खरा सिनेमा २० तारखेच्या आधी दिसेल. केवळ ट्रेलरमुळे या नेत्याचा तोल ढळू लागला आहे. तोल गेल्याने आणि समोर पराभव दिसू लागल्याने त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर येत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता केली आहे. राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट) येथे शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, समरजितसिंह घाटगे, डॉ. नंदिनी बाभूळकर, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, व्ही. बी. पाटील, आर. के. पवार, रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, आपल्या भाषणातून सभेतील प्रत्येक वक्त्यांनी मुश्रीफ यांना टार्गेट केले.

गद्दारी केलेल्यांना महाराष्ट्र प्रायश्चित देतोच. दोन मराठा नेत्यांचे पक्ष फोडलेल्यांना आणि आपापले पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांचं विसर्जन करून त्यांना प्रायश्चित देण्यासाठी निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरचा मुहूर्त शोधला आहे. हा मुहूर्त जनतेने वाया घालवू नये. खासदार कोल्हे म्हणाले, निष्ठेचे प्रतीक असलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पावन भूमीचा अभिमान असेल, तर पक्षाशी व नेत्याशी प्रतारणा केलेल्यांचा तितकाच तिटकारा करा. हा तिटकारा दाखवण्याचा मुहूर्त ठरला आहे. उपभोगशून्य स्वामीत्वचा अर्थ काहींना न कळणाऱ्यांच्या तोंडून अपशब्द बाहेर येत आहेत. तो त्यांच्या नजरेचा दोष आहे असा टालोही त्यांनी यावेळी मुश्रीफांना लगावला.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर

समरजितसिंह घाटगे म्हणाले, गेली पाच वर्षे गडहिंग्लज भागातील जनतेचा विश्वास कमावण्यासाठी काम केलं आहे. मुश्रीफांच्या तोंडून पुढील पाच वर्षे काय काम करायचं याचं धोरण नसल्यानेच शिव्या बाहेर येताहेत. मंत्रिपद असतानाही त्यांनी आंबेओहोळ व हद्दवाढ का केली नाही? कागल व गडहिंग्लजमधील अनेक वसाहतींतील घरांचे प्रॉपर्टी कार्ड नाहीत. त्यांना आता हक्काचं घर देणं, औद्योगिक वसाहतीत उद्योग आणणे, फुटबॉल खेळाडूंना सुविधा देणं हे माझं व्हीजन आहे. विरोधकांच्या टीकेला हे व्हीजनच उत्तर आहे. यामुळे जनतेने परिवर्तनाची सुरुवात कागलमधून करावी असं घाटगे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img