7.2 C
New York

Assembly Election : असा असेल महाराष्ट्रात निवडणूक कार्यक्रम

Published:

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज मंगळवारी (ता. 15 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेची (Assembly Election) तारीख जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल नेमके कधी वाजणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यामुळे आता केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून 23 तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम देखील याशिवाय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. (This will be the program of assembly elections in Maharashtra)

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर झारखंड विधानसभेची मुदत 4 जानेवारी 2025 पर्यंत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेणे आवश्यक आहे. मात्र याच महिन्यात म्हणजे दिवाळी आणि छठपूजा हे दोन्ही महत्त्वाचे सण येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणूक कधी होणार असा प्रत्येकाला प्रश्न पडला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक आणि 23 तारखेला मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात झारखंडमध्ये मतदार होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. भाजपा 105 जागा जिंकून त्या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते. त्यानंतर राज्यात राजकारणातील आजवरचे महानाट्य पाहायला मिळाले. सुरुवातीला अडीच वर्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याने राज्यात मविआचे सरकार कोसळले अन् नव्याने महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार? हे पुढील महिन्यात स्पष्ट होईल.

Assembly Election महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार

22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार
29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख
30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार
4 नोव्होंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
20 नोव्होंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार
23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img