17.2 C
New York

Sanjay Raut : काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील

Published:

दसरा मेळ्यापूर्वी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. खरा दसरा मेळावा सायंकाळी शिवतीर्थावर होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे काही डुप्लिकेट लोक भाड्याने माणसे गोळा करून दसरा मेळावा घेतील, असा मोठा प्रहार त्यांनी केला. ते म्हणाले की, आज राजकीय दसरा मेळाव्याची लाट आली आहे. राज्यात आज अनेक दसरा मेळावे होत आहेत. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. मराठवाड्यात दोन सभा होत आहेत. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांनी दसरा मेळाव्याला सुरुवात केली. त्यांनी दसऱ्याला सोन्याचा विचार दिला. दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र देशाला विचाराचे सोने देत राहिला. ती परंपरा उद्धव ठाकरेंनी जपली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे जवळपास दोन तास हवेत घिरट्या… फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी

तुम्ही पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव चोरले असेल पण जनता मूळ शिवसेनेसोबत आहे. तो निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेना कोण आहे हे निवडणुकीनंतर समोर येईल. शिवसेना कोणती मोदी-शहांच्या मेहरबानीवर जगते की या मातीसाठी कोण लढते, हे राज्यातील जनतेने ठरवले आहे. त्यामुळे मुंबईतील आजचा दसरा मेळा उद्याच्या विधानसभेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला. आता विधानसभेतही मोठे यश मिळेल, असे ते म्हणाले.

अभिनेते सयाजी शिंदेंची राजकीय इनिंग, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img